GS SOCIETY

विद्यार्थी बक्षीस योजना

गससोसायटीच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे...!

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी ही महाराष्ट्रात आर्थिक क्षेत्रात एक नावाजलेली संस्था म्हणून सर्वपरिचित आहे. सभासदांच्या हिताला सर्वतोपरी प्राधान्यदेऊन शतकापेक्षाहीं अधिक काळापासून या संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे. सभासदाच्या अडचणीच्या काळात त्याला सदैव मदतीचा हात संस्थेने दिला, आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पारपाडलेली आहे, सभासदाला आर्थिक -दृष्ट्या सक्षम करण्यास हात भार लावलेला आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही.

उद्दिष्ट्ये

१) सभासद, कर्मचारी आणि त्यांचा पाल्यांच्या राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षा होण्यासाठी सक्षम बनविण्यास मदत करणे .

२) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्यामधे स्पर्धा परीक्षांला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.

३) नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वस्तरावरील स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे.

४) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना अद्यावत ग्रंथालय सुविधा आणि इंटरनेट सुविधा पुरविणे.

५) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षासाठी आवश्यक संदर्भसाहित्य ग्रंथालयद्वारे उपलब्ध करून देणे.

६) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षासाठी प्रोत्साहन, प्रेरणा मिळावीयासाठी तज्ञ अनुभवी व्यक्तीच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करणे.

७) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेशित उमेदवारांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देणे. 


All Rights Reserved @ gssociety.com