जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी ही महाराष्ट्रात आर्थिक क्षेत्रात एक नावाजलेली संस्था म्हणून सर्व परिचित आहे. सभासदांच्या हिताला सर्वतोपरी प्राधान्य देऊन शतकापेक्षाहीं अधिक काळापासून या संस्थेची यशस्वी वाटचाल चालू आहे . सभासदाच्या अडचणीच्या काळात त्याला सदैव मदतीचा हात संस्थेने दिला, आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडलेली आहे, सभासदाला आर्थिक -दृष्ट्या सक्षम करण्यास हातभार लावलेला आहे, याबद्दल तिळमात्र शंका नाही.

सभासद, कर्मचारी आणि सभासदाच्या पाल्यांना बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आता आवश्यकआहे. सभासद,कर्मचारी आणि सभासदाच्या पाल्यांनी चाकोरीबद्ध नोकरीच्या मागे न लागत प्रशासकीय सेवे मध्ये देखील मुसंडी मारणे ही आज काळाची गरज झालेली अहि. आपल्या खान्देशात बुद्धीवानांची वानवा नाही , परंतु उणीव आहे ती योग्य दिशा दर्शनाची, मार्गदर्शनाची , योग्य अशा साधन सामुग्रीची, तज्ज्ञ अशा मार्गदर्शनाची आणि पाठी वर शाबासकीची थाप मारण्याची. आपल्या भागातील मनुष्यबळ  कुठेही कमी नाही, असे असले तरी आणखी प्रयत्न होणे देखील आवश्यक आहे. 

सभासद, कर्मचारी आणि सभासदाच्या पाल्याना आपले मत मारून परंपरागत चौकट स्वीकारावी लागते. केंद्रीय लोकसेवा आयोगा ( UPSC ) महाराष्ट्र लोकसेवा आयोग( MPSC ), बँकांच्या परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा इत्यादि विषयीं आपण क्षमता असून सुद्धा अनभिज्ञ राहतो, परिणामत: इच्छा असूनही काहीही करू  शकत नाही. सभासद, कर्मचारी आणि सभासदाच्या पाल्यांना उत्तमरीत्या मार्गदर्शन, अध्ययन साहित्य घेण्यासाठी मुंबई-पुणे यासारख्या महानगरामध्ये जावे लागते, हीं अंत्यंत खर्चिक आणि सभासदाच्या पाल्यांना न पेलवणारी बाब आहे. मोठया महानगरामध्ये जाऊन राहणे, स्पर्धा परिंक्षाची तयारी करणे किंत्ती जणांना आर्थिककदृष्टया पेलवणारे असते? मग आपण, पालक आपल्या पाल्याच्या आणि आपल्याही इच्छा आकांक्षा यांना मुरड घालतो. ही बोच आपल्याला सतत सतांवत असते. ही खंत दूर होण्याची दृष्टीने प्रयास होणे गरजेचे असल्यामुळे ग.स. प्रबोधिनी आवश्यक आहे.

ग.स. प्रबोधिनीद्वारे सभासद, कर्मचारी आणि सभासद पाल्यांना महानगरात मिळणाऱ्या भौतिक सुविधा, सुसज्ज अद्यायावत ग्रंथालय सुविधा, इंटरनेट सुविधा, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि सद्गुपेशक (मेंटॉर) या सारख्या आणि इतर बाबी  उपलब्ध कशा रीतीने करून देता येतील यादृष्टीने प्रयत्न करण्याचा मानस या प्रबोधन द्वारे आहे.

 

उद्दिष्ट्ये

१) सभासद, कर्मचारी आणि त्यांचा पाल्यांच्या राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय स्पर्धा परीक्षा होण्यासाठी
सक्षम बनविण्यास मदत करणे .

२) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्यामधे स्पर्धा परीक्षांला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण
करणे.

३) नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व स्तरावरील स्पर्धा
परीक्षा विषयी मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणे

४) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना अद्यावत ग्रंथालय सुविधा
आणि इंटरनेट सुविधा पुरविणे.

५) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा
परीक्षा साठी आवश्यक संदर्भ साहित्य ग्रंथालय द्वारे उपलब्ध करून देणे

६) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धापरीक्षासाठीप्रोत्साहन,
प्रेरणा मिळावी यासाठी तन्य अनुभवी व्यक्तीच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करणे.

७) सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेशित
उमेदवारांना अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून देणे.

स्वरूप

सभासद, कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांमध्ये स्पर्धा परीक्षे संबंधी  जागृती होऊन त्यांना स्पर्धा परीक्षे संबंधी योग्य माहिती पोहोचविन्यासाठी तज्ञ  आणि अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करून स्पर्धा परीक्षेविषयची भिती, गैरसमज दूर करून ,शंका निरसन केले जाऊन स्पर्धा परीक्षेविषयीची आवड निर्माण होईल अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल.

सभासद कर्मचारी आणि त्याचा पाल्याना प्रवेश घेन्या साठी किमान शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक असेल, मानसशास्त्रीय क्षमता चाचण्यांच्या आधारे कल मापन चाचणी घेतली जाईल , त्याचा सोबत प्रवेश चाचणी परीक्षा आणि मौखिक परीक्षा उत्तीर्ण होणेआवश्यकअसेल त्यामुळे हुशार, बुद्धिमान , होतकरू सभासद, कर्मचारी आणि सभासद पाल्यांची निवड होऊन त्याना मार्गक्रमण  करण्याच्या दृष्टीने प्रबोधिनी द्वारे मार्गदर्शन आणि सुविधा याचा लाभ घेता येईल. परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यक्रमात, उपक्रमात सक्रिय
सहभाग घेणे आवश्यक असेल. तसेच वेळोवेळी अनुधावंन  परीक्षा घेतती जाईल त्यासाठी उपस्थित राहून उत्तमरीत्या प्रगतीचा आलेख चढता ठेवणे अपेक्षित आहे.

प्रबोधिनी मार्फत ठराविक कालांतराने शासकीय, प्रशासकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केलेल्या  व्यक्तींचा व्याख्यानाचे , मार्गदर्शनाचे , त्यांच्यासोबत आंतरक्रिया करण्याची संधी उपलब्ध करून जाईल.  त्याच प्रमाणे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टी ने सॉफ्ट स्किल, मुलाखत तंत्र , संभाषण कौशल्य , गट चर्चा  यांचे आयोजन केले जाईल त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आवश्यक असेल.

.